फलटण:-गणेशोत्सव सामाजिक स्नेहबंध जपणारा उत्सव.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गणेशोत्सव सामाजिक स्नेहबंध जपणारा उत्सव.
फलटण :- भारतीय समाजजीवनात विविधतेतून एकतेची जोपासना करणारी प्राचीन काळापासून माणवता व माणूसकी वृध्दिंगत करणारी परंपरा आहे.जगाची एक सुंदर प्रतिकृती म्हणजे भारत देश.जगातील सर्व धर्म भारतात गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत.भारतात सर्व धर्मियांचे सण उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात एकोप्याने शांततेत आनंदाच्या वातावरणात जल्लोषात साजरे केले जातात.
गणेशोत्सव हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रात राज्यात प्राचीन ऐतिहासिक काळापासून चालत आलेला उत्सव आहे.गणपती हिंदू धर्म शास्त्रानुसार बुध्दी व प्रगतीची देवता आहे.गणपतीची पुजा दर्शन हिंदू प्रमाणे अनेक धर्मातील लोक श्रध्दा भक्तिभावाने घेतात. गणेशोत्सव सामाजिक स्नेहबंध जपणारा उत्सव आहे.स्वांतत्रोत्तर काळात गणेशोत्सव हा सामाजिक उत्सवासोबत आर्थिक उलाढाल वाढवणारा व्यापक महोत्सवात रुपांतरीत झाला.गणपती मुर्ती बनवणारे कारागिर, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे व्यावसायिक, विविध रंग, रंगकाम करणारे रंगारी,गणपती मंडळे,मंडप स्पिकर,डेकोरेशन करणारे, खिरापत तयार करणारे,प्रसाद निर्मिती करणारे, मोदक तयार करणारे,फुले,पाने,दुर्वा, पुजारी,आरती साहित्य,गुलाल, अगरबत्ती,तेल,वात,दिवा, विद्युत रोषणाई, महाप्रसादाचे आयोजन, मिरवणूक या विविध प्रकारचे छोटे मोठे लघु मध्यम मोठे व्यवसाय गणेशोत्सव काळात तेजीत येतात.कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल वाढवणारा व व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा गणेशोत्सव हा सामाजिक व आर्थिक प्रगतीचा एक कणा आहे.
गणेशोत्सव सामाजिक स्नेहबंध जपणारा उत्सव असून गणेशोत्सवाला व्यक्तीगत, सामाजिक व राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले आहे.ग्रामीण,निमशहरी,शहरी व महानगरांत गणेशोत्सव हा जल्लोषात आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो.गणेशोत्सव काळात सामाजिक प्रबोधनाचे व मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे केले जातात.गणेश मंडळाच्या वतीने व्याख्यानमाला, कलापथक, सांस्कृतिक कार्यक्रम,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान,भजन कीर्तन प्रवचन या सारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
गणेशोत्सव सामाजिक स्नेहबंध जपण्यासाठी सामाजिक व आर्थिक प्रगतीचा आलेख वाढविण्यासाठी गणेश मंडळांनी, सामाजिक संस्था, विधायक रचनात्मक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, समाजसुधारक, शासन यांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशातील समाजातील आपत्तीग्रस्तांच्या, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वंचितांच्या सक्षमीकरणासाठी ठोस रचनात्मक दिर्घकालिन आर्थिक उपाययोजना करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करण्याची काळाची गरज आहे.
गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, पर्यावरण, स्वच्छता अभियान या सारख्या सामाजिक व राष्ट्रीय, वैश्विक गरजेच्या आवश्यक बाबींचा विचार करून कामकाज करावे.अशी श्री गणेशाचे चरणी प्रार्थना.!!! लेखक श्री अनिलकुमार बुवासाहेब कदम यांनी प्रतिपादन केले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन