क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कारवाई; केवळ दोन तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कारवाई;
केवळ दोन तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड.
पुणे, दि. 19 (शफिक शेख):- जबरी चोरीच्या गुन्हयात हवे असलेले आरोपी श्रीकांत भरत कदम, वय 32 रा. हेल्थ कॅम्प चाळ नं. 5, पांडवनगर, पुणे आणि सुरज राजू धोत्रे, वय 32 रा. 883 जुनी वडारवाडी वडारवाडी, पुणे यांना केवळ दोन तासांत शिवाजीनगर पोलिसांनी शिताफिने पकडले. शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 18/12/2022 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर येथे नोंद असलेले गुन्हा 199/2022 भा.दं.वि. कलम 392, 170 आणि 34 प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी हे शनी मंदिर, वडारवाडी येथे असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी वरील गुन्हा आपणच केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोर मोबाईल, रोख रक्कम, आधार कार्ड गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 65,500/- मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त श्री. संदीपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग सतीश गोवेकर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. विक्रम गौड, सहा. पो. नि. भोलेनाथ अहिवळे, पो. उप. नि. अर्जुन नाईकवाडे, पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सयद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांनी केली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button