पुणे निगडी:-सेक्टर 22 मधील श्रमिकनगर येथील नागरिकांच्या आरोग्यास तुंबलेल्या गटरांमुळे धोका.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सेक्टर 22 मधील श्रमिकनगर येथील
नागरिकांच्या आरोग्यास तुंबलेल्या गटरांमुळे धोका.
निगडी, दि. 20 (शफिक शेख):- एकीकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरास ‘‘वॉटर प्लस’’ प्रमाणिकरण प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे तर त्याच प्रयत्नांना खोडा घालणारी ड्रेनेज विभाग हे नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. सेक्टर नंबर 22, श्रमिकनगर, शंकर मंदिराजवळ, यमुनानगर हॉस्पिटलजवळ राहणा-या नागरिकांच्या आरोग्यास आणि त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
येथील ड्रेनेज पूर्णपणे तुंबले असून सर्व घाण आणि मैलापाणी नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावर वाहत आहे. लहान मुले, स्त्रिया, वयस्कर नागरिक यांना मोठया जिकीरीने आपले जीवन जगावे लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेकवेळा पालिकेत आणि संबंधित ड्रेनेज विभागात तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते राजू शेख यांनी आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांना दिली आहे. येथील नागरिकांना कोणीही वाली उरलेला नाही.
माननीय आयुक्त साहेब या प्रकरणाची गंभीर दखल घेवून संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत आणि दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. एकीकडे आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड शहरा वॉटर प्लस प्रमाणिकरण प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत जर अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात असेल तर कसे वॉटर प्लस प्रमाणिकरण प्राप्त होईल, असेही नागरिकांमधून संतापाने सांगितले जात आहे.