कराड:-ग्रामपंचायत मतमोजणीमुळे कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल….
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
ग्रामपंचायत मतमोजणीमुळे कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल….
December 19, 2022
ग्रामपंचायत मतमोजणीमुळे कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल….
कराड दि.19 (प्रतिनिधी) कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीची मतमोजणी येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात उद्या सकाळी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर शहरात येणारी व बाहेर जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी दिली.
मतमोजणी शहरात होत असल्याने वाहन धारकांचे व पादाचार्यांचे सुरक्षेतेच्या तसेच कोणतेही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी व वाहतूक सुरळीत, सुरक्षित होण्याच्या दृष्टीने व वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक असल्याने कराड शहरातील तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत व परिसरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी व वाहनांचे पार्किंग व्यवस्थित करिता आज मध्यरात्रीपासून उद्या मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
वाहतूक मार्गातील तात्पुरता बदल…
नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणारा मार्ग– भेदा चौक ते शाहू चौक कडे जाणारा रोड, दत्त चौक ते शाहू चौक जाणारा रोड, दत्त चौक ते भेदा चौक जाणारा रोड- पोपटभाई पेट्रोल पंप ते दत्त चौक जाणारी वाहतूक बंद असणार आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्था…
भेदा चौका कडून दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही भेदा चौक- विजय दिवस चौक या मार्गाने कराड शहरात जातील.
कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहतूक व दत्त चौकाकडे जाणारी वाहने ही कोल्हापूर नाका- पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक विजय दिवस चौक मार्गे जातील.
दत्त चौक ते शाहू चौक, भेदा चौक बाजूकडे जाणारी वाहने ही दत्त चौक-कर्मवीर पुतळा-विजय दिवस चौक भेदा चौक मार्गे जातील.
वारंजी कडून जुन्या कोयना पुलावरून कराड शहरात येणारी वाहने ही दैत्यनिवारणी चौक- अजिंठा चौक पोपटभाई पेट्रोल पंप- भेदा चौक- विजय दिवस चौक मार्गे जातील मात्र शाहू चौकात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाहनांची पार्किंग व्यवस्था-
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणारी शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या वाहनांसाठी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी भेदा चौक, दैत्यनिवारणी मंदिर परिसर, साईबाबा मंदिर परिसर (दत्त चौक) या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख सातारा यांनी जाहीर केलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्याकरिता वर नमूद केलेल्या तात्पुरत्या वाहतूक व्यवस्थे प्रमाणे वाहनधारकांनी आपली वाहने नियोजित रस्त्यावरून प्रवास करण्याचे आव्हान कराड वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी केले आहे.