पुणे:-मदत’साठी दीड लाखाची लाच स्विकारताना सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकास अटक.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
‘मदत’साठी दीड लाखाची लाच स्विकारताना
सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकास अटक.
पुणे, दि. 19 (शफिक शेख):- खून आणि मोका च्या केसमध्ये सुटकेसाठी मदत करण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सचिन अशोक देठे यांस दीड लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मावसभावाविरूद्ध ‘खून आणि मोका’चा गुन्हा दाखल झाला होता. त्या केसची सुनावणी शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होती. आरोपी देठे हे ही त्याच सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार यांना सदर खून आणि मोका खटल्याच्या साक्षीच्या जाबजबाबामध्ये टायपिंग करताना आवश्यक बदल करून त्यांच्या भावाची सुटका करण्याची हमी दर्शविली त्याच्या मोबदल्यात देठे यांनी सुरूवातीला 10,00,000/- रूपयांची लाच मागितली. परंतु तक्रारदार यांच्याकडे तेवढे पैसे नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. सदर तक्रारीची पडताळणी करताना देठे यांनी 2,00,000/- रूपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ला. प्र. विभागाने शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर झेरॉक्सच्या दुकानावर सापळा रचला आणि तक्रारदार यांच्याकडून 1,50,000/- रूपये लाच स्विकारताना देठे यांना रंगेहाथ पकडले.
याबाबत ला. प्र. वि. युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (तपास अधिकारी) यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोर्टासमक्ष श्री. देठे यांना हजर केले असताना कोर्टाने सुरूवातीस त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर शिक्षेसाठी येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस उपायुक्त श्री. अमोल तांबे, ला. प्र. वि. पुणे मा. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली.
शासकीय अधिकारी/कर्मचारी/लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास खालील नमूद क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री. अमोल तांबे यांनी केले.
हेल्पलाईन क्रमांक 1064
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे – 02026122134, 02026132802, 02026050423
व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – 7875333333
व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – 9930997700
ईमेल आयडी पुणे – dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in