आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला,

आज आमच्या आश्रमशाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पूजन मा.श्री मधुसूदन मोहिते-पाटील(दादा) चेअरमन, श्री गाडगे महाराज मिशन,मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले .
दादांनी आपले मनोगत व्यक्त करताना चूल व मूल ही संकल्पना बदलली आहे, स्त्री शिकू लागली आहे .वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. स्त्री व पुरुष भेदभाव न करता समानता यावी यासाठी विशेष प्रयत्न करणे समाजाच्या दृष्टीने गरजेचे आहे असे सांगितले.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.भारती मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना फार महत्त्वाचे स्थान आहे. स्त्री शिकली तर कुटुंब शिकू शकते, *’सावित्रीच्या लेकी आता आम्ही मागे राहणार नाही’* हे सांगून आपले कर्तृत्व सिद्ध करणार असे सांगितले .

उपशिक्षक श्री. सूर्यकांत गेजगे सरांनी सवित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओवी सादर केली .

कार्यक्रमाच्या निमित्ताने कु.गौरी बडेकर, कु.सनिका सरोदे, कु.श्रेया शिंदे, कु.प्रियांका चव्हाण, कु.जान्हवी भाग्यवंत,कु.प्रणिता शिंदे व साहिल हंडाळ यांनी उस्फूर्तपणे भाषणे केली .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.सुमय्या मुल्ला हिने केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.हर्षदा दंडिले व आभार कु.प्रतिक्षा शेंडगे हिने मानले.
विशेष म्हणजे सर्व कार्यक्रमाचे नियोजन इ. १०वी च्या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, अधिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button