पुणे:-मोशी येथे भारतातील सर्वात मोठया कृषि प्रदर्शन “किसान”चे उदघाटन.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मोशी येथे भारतातील सर्वात मोठया कृषि प्रदर्शन “किसान”चे उदघाटन.
मोशी, दि. 13 (शफिक शेख):- भारतातील सर्वात मोठया किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवारी १४ तारखेला सकाळी ९ वाजता पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १४ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान होत आहे. १५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये देशभरातून दिड लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे.
किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य व इतर शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या ८० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे. उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील..
पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु. १५०/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल ॲपवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहे (रु. १००). किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२० – ३०२५२००० / www.kisan.in