मुंबई:-भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया महिला संघावर सुपर ओव्हर मध्ये मात.
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483)
(क्रीडा) :: भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया महिला संघावर सुपर ओव्हर मध्ये मात.
(मुंबई ) :: येथील डॉ. डी वाय पाटील स्टेडियम वर झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाचा सुपर ओव्हर मध्ये पराभव करत 5 सामन्याची मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आणली….
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला..ऑस्ट्रेलिया संघाने बेथ मुने 82* (54) व तहीला मेग्राथ 70* (51) नाबाद अर्धशतकी खेळीने भारतासमोर 188 धावांचे लक्ष्य उभे केले…
188 धावांचा पाठलाग करताना भारताकडुन सलामीवीर स्मृती माधंना 79 (49) , शेफाली वर्मा 34 (23) आणि शेवटच्या 2 शतकात रिचा घोष 13 चेंडूत 3 षटकारांच्या साहाय्याने 26 धाव काढल्या, शेवटच्या चेंडूवर 5 धावा हव्या असताना देविका वैद्य च्या चौकार मारून सामना टाइ केला…
सुपर ओव्हर मध्ये रिचा घोष 6 व स्मृती मंधना 13 धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलिया समोर 21 धावांचे मोठे आव्हान उभे केले.ऑस्ट्रेलिया संघ 16 धावांच करू शकला…आणि हा प्रेक्षणीय सामना भारताने जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली….
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591