मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन.
मावळ तालुका भाजपचा आधारवड हरपला.
मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे आज दुपारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. भेगडे यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना सोमाटणे येथे खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राण ज्योत मालवली. इंदोरी गावच्या सरपंच पदापासून राजकीय वाटचाल सुरू करून, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ खरेदी विक्री संघाचे सदस्य, पंचायत समिती उपसभापती, भाजपा तालुका अध्यक्ष, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष ते मावळ तालुक्याचे सलग दोन वेळा आमदार असा राजकीय प्रवास केला. मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यात आपल्या कार्यशैलीमुळे, आणि कार्य कर्तृत्वामुळे राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणारे, आध्यात्मिक तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार पंढरीचा वारकरी विधान सभेचा मानकरी अशी स्वताची एक वेगळी छबी निर्माण करणारे, अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख असलेले दिगंबर भेगडे यांची प्राण ज्योत मावळल्याणे संपूर्ण मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्काच बसला आहे. तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.