आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे-निगडी:-ज्ञानदीप विद्यामंदिर प्राथमिक शाळेत ईद-ए-मिलाद व कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी शापिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ज्ञानदीप विद्यामंदिर प्राथमिक शाळेत ईद-ए-मिलाद
व कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
निगडी, दि. 8 (शफिक शेख):- आज सर्वत्र धार्मिक कट्टरतेचे वातावरण असताना आणि आपल्या देशातील सर्वधर्म समभाव, बंधूता या संपत असताना रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप विद्यामंदिर रूपीनगर प्राथमिक शाळेने मुलांमध्ये सर्वधर्म समभावाची मूल्ये रूजविण्यासाठी उद्या शाळेला सुट्टी असल्याने आज रोजी शाळेमध्ये ईद-ए-मिलाद आणि कोजागिरी पौर्णिमा ही विविध कार्यक्रमांनी साजरी केली. सदर कार्यक्रमाची संकल्पना ही सौ. सोनवणे मॅडम यांची होती. आजचा हा कार्यक्रम समाजात धर्मांधता वाढविणा-यांना एक चपराक होती.
या दिवसानिमित्त शाळेमध्ये लहान मुलांना परिपाठातून वरील सणांची माहिती सांगण्यात आली. वेगवेगळी माती जरी असली तरी हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई सारे एकच आम्ही हे समूह गीतही यावेळी घेण्यात आले. यावेळी सर्व मुस्लिमधर्मिय विद्यार्थाी आणि विद्यार्थिनी मुस्लीम वेशभूषा करून आले होते. त्या मुलांनी ईदविषयी सुंदर माहिती सांगितली.
सर्वांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. संविधानातील समता, बंधूता, सर्वधर्म सहिष्णूता या मूल्यांची रूजवण करण्यात आली. तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री. म्हस्के सर आणि सौ. सोनवणे मॅडम यांनी प्रार्थना व अभंग घेतले. सर्व शिक्षकांनी परिपाठात सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नवले मॅडम यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button