पुणे पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 ची जबरदस्त कारवाई.
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 ची जबरदस्त कारवाई.
48 तासांत भोसले पेट्रोल पंपावरील चोरीचा पर्दाफाश
चिखली, दि. 25 (शफिक शेख):- येथील भोसले ब्रदर्स पेट्रोल पंपावरील गल्ल्यातील चोरलेल्या 8,93,136 रूपये रकमेचा 48 तासांत तपास लावून आरोपीस पकडण्यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 ला यश आले आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरातून चिखली पोलिसांचे आणि पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांचे आभार व्यक्त होत आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दि. 20/11/2022 रोजी चिखली परिसरातील भोसले ब्रदर्स पेट्रोलियम या पेट्रोल पंपाच्या लाकडी लॉकरमधून दिवसभरातून जमा झालेली रोख रक्कम रूपये 8,93,136 ही अज्ञात चोरटयाकडून बनावट चावीने लॉकर उघडून चोरण्यात आल्याची तक्रार पंपाचे मालक विशाल जगन्नाथ भोसले यांनी चिखली पोलीस ठाणे येथे दाखल केली असता पोलिसांनी भादवि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करून तपासास सुरूवात केली.
यावेळी पंपमालक भोसले यांच्या संशयावरून पूर्वी सोडून गेलेल्या आणि ज्यांच्यावर संशय आहे अशा कामगारांची तपासणी चालू केली असता पूर्वी काम सोडून गेलेला कामगार रामबाद्दूर यादव, वय 22 वर्षे, रा. मु. मोहरिया, पो. इटावा, ता. महु, जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश याचे वर्णन हे सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे मिळते जुळते मिळून असल्याचे आणि ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी त्याचा वावर पंप परिसरात दिसून आल्याने गुन्हे शाखा युनिट 1 यांनी वरिष्ठांच्या आदेशाने उत्तर प्रदेश येथे जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी यादव यास ताब्यात घेतले आणि त्यास युनिट 1 चे कार्यालयात आणले असता आणि पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर यादव याने चोरी केल्याचे कबूल केले. यानंतरची पुढील कारवाई करण्याचे काम चिखली पोलिसांकडे देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे व.पो.नि. ज्ञानेश्वर काटकर, पो.उ.नि. इम्रान शेख, रविंद्र राठोड, पोलीस अंमलदार महादेव जावळे, फारूख मुल्ला, गणेश महाडीक, अमित खानविलकर, सचिन मोरे यांच्या पथकाने केली.