ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत – सुनील कास्टेवाड.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
मतदार यादीत नावे नोंदवावीत – सुनील कास्टेवाड.
पिंपरी, दि. 25 (शफिक शेख):- विद्यार्थ्यांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवून मतदान करावे आणि आपली लोकशाही बळकट करण्यास मदत करावी, असे आवाहन सुनील कास्टेवाड यांनी केले. आज दिनांक 25.11.2022 रोजी 207 भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ कला,वाणिज्य महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथे व मॉडर्न हायस्कूल निगडी येथे व अन्य महाविद्यालयात नव मतदारांची मतदार यादीत नोंदणी होणे कामी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील नवं मतदारांची Voter Helpline दवारे Online व ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून घेण्यात आली.
सदरील शिबिरात विद्यार्थ्यांना 207 भोसरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. राणी ताटे मॅडम, गीता गायकवाड मॅडम अपर तहसीलदार पिंपरी चिंचवड तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, आण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी क विभाग तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व श्री अशोक पाटील सर प्राचार्य राजमाता जिजाऊ कॉलेज लांडेवाडी भोसरी व श्री पांडुरंग पवार तहसीलदार करमणूक कर अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व श्री सुनील कास्टेवाड महसूल सहायक 207 भोसरी विधानसभा मतदारसंघ यांनी मोलाचे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले आहे..

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button