पुणे पिंपरी:-महापालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
महापालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकर पवळे
यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
पिंपरी, दि. 25 (शफिक शेख):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,माजी महापौर मधूकर पवळे यांच्या मुली सुनिता चोरगे,अनिता लांडे तसेच नातेवाईक ओंकार पवळे, विनायक चोरगे, विनीत गवारे, साहिल लांडे, नागेश गवारे, रघुनाथ कदम, संतोष कवडे, महेंद्र पाडाळे, लव धुमाळ, योगेश गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.