आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-संगीतमय तुळशी रामायण कथा सत्संग सोहळा युवकांसाठी ठरतो परिवर्तनाची नांदी.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483.
लोहगाव वार्ताहर कोंडीराम नेहे :
राहाता तालुक्यातील
लोहगाव – नेहरूनगर प्रवरा परीसर येथे सुरू असलेल्या संगीतमय तुलसी रामायण कथा सत्संग सोहळा हा युवा पिढीसाठी परिवर्तनाची नांदी ठरत आहे.
युवकांना दिशा देण्यासाठी रामायणाचार्य भागवताचार्य शिवचरित्र व्याख्याते ह .भ .प . संदीपजी महाराज चेचरे यांनी स्थापन केलेल्या श्री साई सद्गुरु गंगागिरी गुरुकुल च्या माध्यमातून युवकांना दिशा देण्याची काम प्रेरणादायी ठरत आहे .
युवक हे देश परिवर्तनाचे मोठे साधन आहे युवकच क्रांती करून परिवर्तन करू शकतात याचा विचार करून लोहगाव येथील ,
ह .भ .प .संदीपजी महाराज चेचरे यांनी ब्रह्मलिंग नारायणगिरी महाराज व रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने कामकाज चालू केलेले आहे.
युवकांच्या पुढाकारातून संगीतमय तुळशीरामण कथा सत्संग सोहळा संपन्न होत आहे .हीच परंपरा येथून पुढेही युवकांना हाताशी धरून कायम चालू ठेवायचा संदीपजी महाराज चेचरे यांचा प्रयत्न राहणार आहे संगीतमय तुलसी रामायण कथा सोहळा हा आगळा वेगळाच म्हणावा लागेल युवकांचे कष्ट , दानशूर व्यक्तींचे सहकार्य , अध्यात्मिक आरोग्य आणि सामाजिक उपक्रमाबरोबर लोकसहभागाचा आदर्श मॉडेल म्हणून हा कार्यक्रम होत आहे .
नोव्हेंबर 18 /11/20पासून सुरू झालेला हा सप्ताह भाविकांसाठी वेगळी पर्वणीच असते . सप्ताहाच्या माध्यमातून संत चरित्राबरोबर आहार ,आरोग्य ,व्यसनमुक्ती ,
योगा शिबिर सामुदायिक सोहळा ,ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार, पर्यावरण संवर्धन ,बाल संस्कार , स्री भ्रूनहत्या अशा एक ना अनेक उपक्रम सप्ताहाच्या माध्यमातून तरुण मित्र मंडळाच्या प्रयत्नातून होत आहे.लोकांना योग्य दिशा देण्याचे काम सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे .
विवाह सोहळा संपन्न :
या कार्यक्रम स्थळी राम कथेतील सीता स्वयंवर प्रसंगी वैजापूर तालुक्यातील श्री कैलास राजेंद्र माळी यांचे चिरंजीव सतीश व राहुरी तालुक्यातील दीपक विठ्ठल बर्डे यांची कन्या ची सौ का सोनाली हिचा विवाह संपन्न झाला हे दोन जीव विवाह बंधनात अडकल्याने या विवाहाचे वेगळे महत्त्व निर्माण झालेले आहे , भाविकांनी आपली मुलगी समजून प्रत्येकाने कन्यादान केले.
एक आदर्शवत सप्ताह प्रवरा परिसरामध्ये संपन्न झाला आहे. कुठलाही खर्च नाही , डाम डौल नाही एक धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे .
या मंगलमय प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या जिल्हा परिषदेच्या माजी अधक्षा मा. सौ.शालिनीताई विखे पाटील यांची उपस्थिती लाभली .
समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करण्याची काम या सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे या समस्त तरुण मित्र मंडळ लोहगाव व नेहरूनगर यांच्या अथक प्रयत्नाने हा सप्ताह संपन्न झाला.
सप्ताह प्रसंगी नामदार राधाकृष्णन विखे पाटील युवा मंच ., साई चरित्र पारायण सोहळा कमिटी , . ॲड. स्मिता प्रवीण मोरे , श्री व सौ.जयश्री प्रदीप वाकचौरे , श्री. राहुल दादा घोगरे पाटील व घोगरे परिवार , समस्त तरुण मित्र मंडळाच्या वतिने अन्नदानाचे नियोजन करण्यात आलेले आहे . परिसरातील नागरिक व या सप्ताहात अनेक छोट्या-मोठ्या सामाजिक संघटना मित्रपरिवार प्रतिष्ठान युवा मंच यांचे भरभरून योगदान आहे .
तुलसी रामायण कथेचे नियोजन राहुल महाराज पोकळे कुबेर महाराज जगधने. साईनाथ महाराज चेचरे माऊली महाराज झुरळे, दीपक महाराज लोंढे , शिवनाथ महाराज पवार, विठ्ठल महाराज चव्हाण . साई पारायण वाचक ज्ञानदेव महाराज वाबळे यांच्या उपस्थिती सोळा संपन्न होत आहे
कार्यक्रम स्थळाचे नियोजन नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा मंच .खासदार सुजय दादा विखे पाटील युवा मंच. राजे प्रतिष्ठान. एकलव्य मित्र मंडळ .दीपक राजे मित्र मंडळ .स्वराज्य शासन मित्र मंडळ .प्रज्ञा सूर्य बहुउद्देशीय संस्था. सम्राट ग्रुप. व समस्त तरुण मित्र मंडळ प्रवरा परिसर यांच्या नियोजनाने संपन्न होत आहे.