नवी मुंबई वाहतूक पोलीसांची हप्ता वसुली व बेकायदेशीर चालणारी अवैद्य खाजगी वाहतूक बंद न केल्यास लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडणार.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
नवी मुंबई वाहतूक पोलीसांची हप्ता वसुली व बेकायदेशीर चालणारी अवैद्य खाजगी वाहतूक बंद न केल्यास लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडणार.
नवी मुंबई वाशी ते पनवेल येथील हायवेवरील प्रत्येक बस स्टॉपवर 200 मीटर अंतरावर कोणतेही वाहन उभे करण्यास व वाहतूक करण्यास बंदी आदेश असतानाही नवी मुंबई वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने 400 खाजगी गाड्या बेकायदेशीर वाहतूक करत आहेत या बाबत नवी मुंबई रिक्षा महासंघाने दिनांक 4/11/2022 व 11/11/2022 रोजी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ,नवी मुंबई पोलीस आयुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग नवी मुंबई पोलीस उपायुक्त तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई याना निवेदने देण्यात येऊनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने दिनांक 21/11/2022 रोजी नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष श्री कासमभाई मुलाणी यांनी नवी मुंबई वाहतुक विभाग यांनी हप्ता वसुली करणारे सुभाष बोडके ,या हवलंदाराची नेमणूक वाहतूक शाखेत नसतानाही बेकायदेशीर खाजगी व्हातुकीचे हप्ता वसुली करण्याची जबाबदारी वरिष्ठांनी त्याच्यावर दिल्याचे व हप्ता वसुली करत असल्याबाबत श्री बोडके यांनी आमच्या नवी मुंबई प्रतिनिधी याच्याशी मो वर बोलताना मान्य केले आहे असे आतांनाही नवी मुंबई उपाआयुक्त वाहतूक विभाग किंवा मा पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही आज रोजीही बेकायदेशीर खाजगी वाहतूक चालू असल्याने नाविलाजास्तव पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक विभाग कोकणभवन नवी मुंबई येथे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार नवी मुंबई रिक्षा महासंघाने दिला आहे याबाबतचे रीतसर पत्र देण्यात आले आहे.