छ.संभाजीनगर:-घरगुती भांडणातून उचलले टोकाचे पाऊल- एकाच घरातील तिघांची आत्महत्या.
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर
संभाजीनगर येथील वळदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृतांमध्ये पती पत्नी व चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर वय 28 पूजा मोहन डांगर वय 24 व श्रेया मोहन डांगर वय चार वर्षे असे मृतांचे नाव आहे सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वळदगाव मध्ये उपसरपंच संजय झळके यांच्या घरी हे कुटुंब भाड्याने राहत होते रात्री च्या सुमारास दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते त्या भांडणातून या दोघांनी स्वतः गळफास घेऊन मुलीलाही गळफास देऊन त्यांनी त्यांची जीवन यात्रा संपविले ही घटना काल दिनांक 19 मे रोजी सकाळी उघडकीस आली ह्या घटनेची नोंद सातारा पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची करण्यात आली घरगुती भांडणातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला.