ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-समाजकल्याण अधिकाऱ्यांविरोधार्थ मुकबधीर’चे उपोषण सुरू !

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

समाजकल्याण अधिकाऱ्यांविरोधार्थ मुकबधीर’चे उपोषण सुरू !

*सातारा* : येथील मुकबधीर विद्यालय चालविण्यास संस्थेचे संस्थापक पार्थ पोळके सक्षम असल्याचे स्पष्ट करीत आहेत. त्यापद्धतीने चांगल्या पद्धतीचा कार्यभारही चालु आहे.तरीही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी मात्र अन्याय केला आहे.त्या निषेधार्थ उपोषण जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांना निवेदन दिलेले आहे.त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा चालु असून लवकरच तोडगा निघेल.असा आशावाद आहे. यासंदर्भात, मुकबधीर विद्यालय संस्था चालविण्यास सक्षम आहे. अशा आशयाचा दाखला समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे देत नाहीत.तेव्हा जोपर्यंत त्या दाखला देत नाहीत.तोपर्यंत उपोषण सोडणार नाही.असे स्पष्ट निर्देश पोर्थ यांनी दिले आहेत.३८ वर्षांपासून सुस्थितीत चाललेल्या विद्यालयास अधिकारी – पदाधिकारी आदींनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले होते.मग आताच विरोध का ? याबाबतही वरिष्ठांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा.पोळके यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,अध्ययनार्थी उपोषणात सहभागी झालेले आहेत. आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यानी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला आहे. यामध्ये रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत सदस्य गणेश कारंडे, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे व कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे,दिव्यांग प्रेरणा बहुद्देशीय संस्थेचे नंदकुमार धनवडे,राष्ट्रीय अपंग विकास संघटनेच्या अनिता धनवडे, शिवांतीका सामाजिक संघटनेच्या वैशाली दुबळे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, कृष्णा गव्हाळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे,हसीना शेख,सौ. शीतल पोतदार आदींचा समावेश होता.

*फोटो : जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसलेले पार्थ पोळके, मान्यवर,अध्ययनार्थी व इतर.*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button