पुणे चिंचवड:-आरपीएस स्टार न्यूज’चा दणका 48 तासांत कारवाई पूर्ण.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
‘आरपीएस स्टार न्यूज’चा दणका
48 तासांत कारवाई पूर्ण.
चिंचवड, दि. 16 (शफिक शेख):- ‘थरमॅक्स चौकातील ड्रेनेजचे तुटलेले झाकण, वाहनचालकांना मृत्यूचे निमंत्रण’ या मथळयाखाली दिनांक 14/11/2022 रोजी आरपीएस स्टार न्यूज ने थरमॅक्स चौकातील धोकादायकरित्या तुटलेल्या झाकणाबाबत आणि त्यामुळे होणा-या अपघातांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची माननीय आयुक्तांनी गंभीर दखल घेत संबंधित ड्रेनेज विभागास त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आणि आज दिनांक 16/11/2022 रोजी ड्रेनेज विभागाने कारवाई करीत सदर ठिकाणी नवीन झाकण बसवून नागरिकांच्ची होणा-या रोजच्या जीवघेण्या धोक्यापासून सुटका केली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांकडून आरपीएस स्टार न्यूजचे अभिनंदन केले जात आहे.
सदर ठिकाणी मागील दीड महिन्यांपासून ड्रेनेजचे झाकण तुटून पडले होते आणि त्या खड्डयात अनेक वाहने पडून अपघातग्रस्त होत होती. अनेक पायी चालणा-या नागरिकांनाही जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती. सदर बाबीची आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी दखल घेत वृत्त तयार केले आणि त्याला आमचे राष्ट्रीय संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी न्याय देत ते वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची माननीय आयुक्त श्री. शेखर सिंह यांनी दखल घेत त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आणि नागरिकांच्या होणा-या जीवित आणि वित्तहानी टाळण्यास मदत केली. त्यामुळे नागरिकांनी माननीय आयुक्तांचेही आभार मानले.