कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीकन्यांचे स्वागत.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषीकन्यांचे स्वागत.

फलटण :
निरगुडी ता फलटण येथे एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त कृषी महाविदयालय फलटण येथून आलेल्या कृषीकन्या पौर्णिमा कद्रे, साक्षी खेडकर, ऋतुजा मोरे, मिनाक्षी घुगे, दर्शना घंटे , आर्या धेंडे, सुरक्षा सस्ते यांचे सरपंच कोमल सस्ते उपसरपंच सारिका बनसोडे, ग्रामविकास अधिकारी एन. एस. कदम, कृषी सहाय्यक संजय गायकवाड व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सहर्ष स्वागत करण्यात आले. सर्व कृषीकन्यांनी सरपंच कोमल सस्ते यांना भेटून गावा विषयी माहिती मिळवली.
या अडीच महिन्याच्या कालावधीत कृषी कन्या शेतातील माती परीक्षण एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन , बीज प्रक्रिया, जनावरांची लसीकरण आदीबाबत गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेतीविषयी जनजागृती करणार आहेत.
यावेळी सरपंच कोमल सस्ते ,कृषी सहाय्यक संजय गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एन. एस.कदम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
‌‌सर्व कृषीकन्यांना प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर प्रा. एन.एस.ढालपे, प्रा. एस. वाय. लाळगे, प्रा. एन .ए. पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button