सातारा:-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थांचे १५ टक्के अनुदानासाठी आमरण उपोषण सुरू !
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थांचे १५ टक्के अनुदानासाठी आमरण उपोषण सुरू !
सातारा: जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांसाठी १५ टक्के अनुदान ग्रामपंचायत प्रतिवर्षी खर्च करीत असते.मात्र, नागझरी व्यतिरिक्त अशी अनेक गाव अनेक वर्षांपासून वंचित आहेत.तेव्हा वरिष्ठांनी सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करून न्याय द्यावा.अशी मागणी मान्यवरांनी केली आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थातर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय (तात्या) गाडे, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, शहराध्यक्ष जे.के.तथा जयवंत कांबळे व त्यांचे कार्यकर्ते, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत (आप्पा) खंडाईत, गणेश कारंडे,शरद शिरसाट,विजय शिरसाट,लक्ष्मण शिरसाट, अनिल शिरसाट,प्रवीण शिरसाट याशिवाय,याबाबत प्रथमतः प्रसिद्धीस देऊन वाचा फोडणारे ज्येष्ट पत्रकार अनिल वीर आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसानाविरोधार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यासंदर्भात,काही गावांनी सरपंच/ग्रामसेवक यांच्यापासून गटविकासाधिकारी यांच्यापर्यंत लेखी-तोंडी वारंवार तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळालेली आहेत.तेव्हा लवकरात लवकर संबंधित गावांतील १५ टक्के अनुदान द्यावे.म्हणून लेखी-तोंडी समज देऊनही सरपंच यांच्यासह सर्वांनीच केराची टोपली दाखवली आहे.
जिल्हाधिकारी यांना नुकतेच नागझरी, ता.कोरेगाव येथील बुद्ध धम्म मित्र मंडळाने निवेदन देऊन मागणी केली होती. १५ टक्के मागासवर्गीय अनुदान खर्चाची चौकशी होऊन त्वरित मिळण्यासाठी प्रयत्न करावा.
नागझरी ग्रामपंचायत यांनी गेली पाच वर्षे झाली आहेत.त्यांनी १५ टक्के अनुदान खर्च केलेला नाही. त्याची चौकशी होऊन आम्हाला अनुदान मिळावे.अशी समज देऊनही दखल घेतली नाही. म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.याची पूर्वसूचना संबंधितांना दिलेली होतीच.सदरच्या निवेदनाच्या प्रति
कार्यकारीअधिकारी – जि.प. सातारा,गटविकास अधिकारी – पं.स.कोरेगाव,ग्रामपंचायत – नागझरी आदींना देण्यात आलेल्या आहेत.तेव्हा सखोल चौकशी करून न्याय द्यावा.अशी आर्त हाक ग्रामस्थातर्फे मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,असंख्य महिला आदींनी दिली आहे.
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना मान्यवर,नागझरी ग्रामस्थ व महिला.