आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहुरी – गुहा:-दुर्लक्षित समाजासाठी प्रवरा प्रेस क्लबने कार्य करावे – पप्पू भाऊ सपकाळ.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव (वार्ताहर )
दुर्लक्षित क्षेत्रात काम करणाऱ्या समाजासाठी  प्रेस क्लब प्रवरेेेने काम करावे असे विचार गंगाधर बाबा छात्रालय गुहा येथील  अधीक्षक पप्पूभाऊ सपकाळ यांनी व्यक्त केले
राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे प्रेस क्लब प्रवरेच्या वतीने बाल दिनाचे औचित साधून अनाथ मुलांना अन्नदान कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात आले होते      . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेस क्लब  प्रवरेची  दुसरी बैठक कार्यक्रम स्थळी उपस्थित पत्रकारांच्या संपन्न झाली यावेळी यावेळी जेष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही  बैठक संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के  म्हणाले की प्रेस क्लब प्रवरेच्या  माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवायचे आहे. वृक्षारोपण काळाची गरज ओळखून वृक्षारोपण समाज हितासाठी गरजेचे असून हे काम आपणास हाती घ्यायचे आहे. ती काळाची गरज असल्याचे आपल्याला. कोरोणा सारख्या महामारीत ऑक्सिजनची अत्यंत गरज भासली होती .त्यामुळे ऑक्सिजन देणारे वड पिंपळ लिंब असे वृक्षारोपण करून सामाजिक हिताचे कार्य आपणास हाती घ्यायचे आहे .त्याच प्रमाणे दुर्लक्षित समाजाला न्याय देण्यासाठी 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आपल्या संघटनेतर्फे दरवर्षी एक पुरस्कार देऊन  दुर्लक्षित समाजामध्ये  कार्य करणाऱ्याचे  कौतुक करून त्याच्यामध्ये नवीन  ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य आपणास हेे कार्य प्रेस क्लब  प्रवराच्या वतीने करायचे आहे असेही ते  यावेळी म्हणाले यावेळी पप्पू भाऊ सपकाळ यांनी सांगितले की गंगाधर बाबा छात्रलयात सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी संगोपन येथे केले जाते .या ठिकाणाहून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर सध्या कार्यरत आहे. तेही येथे वेळोवेळी येऊन   विद्यार्थी यांना आपल्या बालपणाच्या आठवणी  विद्यार्थ्यांबरोबर सांगतात व  त्यांना जगण्याची नवीन ऊर्जा देतात असेही ते म्हणाले यावेळी या कार्यक्रमास राहुल विधाटे गंगाधर  पंधरे. विकास धनवटे. उत्तमराव  काठोकाठ. अविनाश पंधरे जेष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय बोडखे. उपाध्यक्ष प्रमोद कुंभकर्ण. प्रसिद्धीप्रमुख कोंडीराम नेहे  पत्रकार प्रकाश औताडे .चंद्रशेखर जगताप. साईप्रसाद कुंभकर्ण. दिलीप धावणे. आदिसह  विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित छात्रालयातील विद्यार्थ्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button