ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे चिंचवड:-भोसलेंवर हल्ला करणा-या गुंडांना जामीनावर कोणी बाहेर काढले? – अजित पवार

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

भोसलेंवर हल्ला करणा-या गुंडांना जामीनावर कोणी बाहेर काढले? – अजित पवार
चिंचवड, दि. 24 (शफिक शेख) – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख) सचिन भोसलेंवर हल्ला करणा-यांना मोक्का लागला होता. त्यांना जामीनावर बाहेर कोणी सोडले? याची माहिती जनतेला आहे. सर्व प्रकारच्या दादागिरीची जाणीव असलेली जनता आपला राग मतपेटीतून व्यक्त करेल आणि नाना काटे यांना विजयी करेल, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी प्रचाराची सांगता पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली, त्यावेळी अजित पवार बोलत होते. पक्षाचे निरीक्षक आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे, माजी आ. विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, रविकांत वर्पे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, पक्षाचे अपहरण, गुन्हेगारी, भ्रष्ट कारभार याला जनता कंटाळली असून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद याची प्रत्यय मला रोड शो आणि मतदारांशी संवाद साधत असताना आला आहे.
शिवसेना कोणाची याची न्यायालयात लढाई सुरू असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथराव शिंदे यांना देऊन टाकले. याविषयी जनतेत संतापाची भावना आहे. निवडणुक आयोगाचा हा वादग्रस्त निर्णय जनतेला मान्य नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला चिंचवड आणि कसब्यात अफाट प्रतिसाद मिळाला. सरकारकडून होत असलेल्या मुस्कटदाबीविषयी जनतेच्या मनात असणारा राग मतपेटीतून व्यक्त करत नाना काटे यांना विजयी करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button