क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई शहरात वाहनांची मोडतोड नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून खेळ पोलिसात नोंद नाही.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

वाई शहरात वाहनांची मोडतोड नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून खेळ
पोलिसात नोंद नाही.

वाई शहरात रविवार पेठेत राम डोह आळी, ब्राम्हणशाही आदी ठिकाणी घराबाहेर लावलेल्या वाहनांची मोडतोड अज्ञात व्यक्तीने केल्याची बाब मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण असून नेमका कोणी प्रकार केला आहे?, वाई शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दहा वाहनांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे, याची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.

वाई शहरात रविवार पेठेतल्या नागरिकांची वाहने रात्री घरासमोर लावलेली असतात. त्याच वाहनाच्या काचा फुटल्याचे सकाळी नागरिकांना दृष्टीस पडले. त्यात ओमीनी, स्विफ्ट, अल्टो अशा कारच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे नेमका कोणी हा प्रकार केला असावा, या परिसरात सीसीटीव्ही असून त्यात हा प्रकार कैद झाला असावा अशी ही शक्यता व्यक्त होत आहे. वाई शहरात यापूर्वी कधी ही असा प्रकार घडला नव्हता मात्र मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडलेल्या वाहनांच्या काचामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button