ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-चोराडेतील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्याचा धैर्यशिल दादांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश.

प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

चोराडेतील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्याचा धैर्यशिल दादांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश.

पुसेसावळी: खटाव तालुक्यातील राजकीत दृष्टया संवेदनशिल असलेल्या
चोराडे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
प्रमुख कार्यकर्त्यानी धैर्यशिल दादांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते भाजपात प्रवेश केल्यामुळे चोराडे गावातील राष्ट्रवादी पार्टीला खिंडार पडले असुन येणार्‍या काळात पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील गावागावातील राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख कार्यकर्ते भाजपामय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकाच गावात राष्ट्रवादीचे एक-एक गट वेगवेगळे निर्माण करायचे आणि स्वत:चा स्वार्थ साधुन घ्यायचा आणि गावातील कार्यकर्तेना भांडत ठेवायचे अशा राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीना कंटाळुन पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील गावागावातील कार्यकर्ते धैर्यशीलदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कास धरत आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणून चोराडे येथील बापूराव पिसाळ,श्रीकांत पिसाळ,
सतीश पिसाळ,वसंत पिसाळ,मंच्छिद्र पिसाळ, प्रकाश पिसाळ,विलास पिसाळ, सचिन पिसाळ, अभिजित पिसाळ, नवनाथ पिसाळ, रामदास पिसाळ, दादासो जानकर, विजय पिसाळ, भाऊसो पिसाळ,काशीनाथ चव्हाण
प्रशांत पिसाळ, उदय बामणे, दत्तु पिसाळ, विष्णुपंत पिसाळ, सुखदेव पिसाळ,संजय चव्हाण, पै.अक्षय पिसाळ,सुधाकर पिसाळ, श्रीकांत बा.पिसाळ,पै.अक्षय घाटगे,आण्णासो पिसाळ,चंद्रकांत अवघडे, विलास पवार, धनाजी पिसाळ,चंद्रकांत पिसाळ,संतोष पिसाळ,सागर पिसाळ,नाथा कणसे,शरद पिसाळ,किरण पिसाळ,राजीव पिसाळ, आदिसह चोराडे गावातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button