खटाव-पुसेसावळी:-दिल्लीच्या तख्तावर शिंदेशाहीने अधिकार गाजवला:-मा जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9921778417

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दिल्लीच्या तख्तावर शिंदेशाहीने अधिकार गाजवला:-मा जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे
_______________________________
पुसेसावळी, ता15::-महादजी शिंदे, राणोजी शिंदे, दत्ताजी शिंदे यांनी 250 वर्षापूर्वी गाजवलेला इतिहास आजच्या पिढीला प्रेरणा निर्माण करणारा असाच आहे सध्याच्या काळात मात्र समाजकारणात आणि राजकारणात वेगळे चित्र बघायला मिळत आहे परंतु इतिहासातील पूर्वजांची कामगिरी पाहिली की निष्ठा कर्तव्य आणि कर्तृत्व यांची जाणीव होते आणि त्यातूनच चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते असे गौरोद्गार माजी जलसंपदा मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले ते खटाव तालुक्यातील वडगाव(ज स्वा) येथे श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शिंदेशाही इतिहास जागृती अभियान कार्यक्रमात बोलत होते यावेळी मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज इतिहास अभ्यासक घनश्याम ढाने प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे उपाध्यक्ष अविनाश शिंदे सचिव दिपक शिंदे राज्य संघटक राजेश शिंदे उद्योजक रमेश उबाळे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे ,पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते सुहास पिसाळ,यांची प्रमुख उपस्थिती होती
शिंदे पुढे म्हणाले की महाराष्टातील शिंदे सरकार घराण्याला पराक्रमाचा आणि शौर्याचा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया महाराष्ट्रात रचला आणि त्यांचे अहद तंजावर तहद पेशावर हे स्वप्न दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठेशाहीचे निशाण लाऊन महादजी शिंदे सरकार यांनी सत्यात उतरवले मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फक्त राखले नाही तर महादजी शिंदे यांच्या रूपाने मराठे दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाले हा खरा इतिहास पुढे यायला हवा शिंदे सरकार प्रतिष्ठान यासाठी गेल्या 15 वर्षापासून प्रयत्न करीत आहे त्यास माझ्याकडून लागेल ती मदत मी करेन.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वडगाव येथील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास आमदार शिंदे आणि प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले
इतिहास अभ्यासक घनश्याम ढाने यांनी वडगाव जयराम स्वामी आणि शिंदे सरकार घराण्यातील मोडी पत्रव्यवहार तसेच हिंदुस्थान च्या इतिहासात शिंदे सरकार घराण्याचे असणारे योगदान यावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी वडगाव मठाला शिंदे सरकारांनी वेळोवेळी देणग्या आणि संरक्षण दिले असल्याची माहिती यावेळी मनोगतामध्ये सांगितली यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला तसेच प्रतिष्ठान च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली
कार्यक्रमास केदार शिंदे सुधाकर शिंदे प्रदीप शिंदे बाळासाहेब शिंदे विश्वजित शिंदे सूरज शिंदे चंद्रकांत शिंदे सतीश शिंदे बापूसाहेब शिंदे दत्ताजीराव शिंदे हणमंत भोसले कमलाकर घारगे सुरेश घार्गे बाळासाहेब भोकरे काशिनाथ दुटाळ जे बी घार्गे आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शिंदे सरकार बंधू उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक संभाजीराव शिंदे यांनी केले तर आभार सुहास शिंदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर शिंदे मयुरेश शिंदे उमेश शिंदे किरण शिंदे प्रदीप शिंदे आकाश शिंदे सागर शिंदे यांनी प्रयत्न केले