पुणे निगडी:-अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या तरूणास 14 दिवसांची कोठडी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या
तरूणास 14 दिवसांची कोठडी.
निगडी, दि. 14 (शफिक शेख):- अंकुश चौक येथे अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी अमोल शिवराज बिराजदार या 22 वर्षीय तरूणास विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
याबबात सविस्तर अशी कि, तक्रारदार महिला या त्यांच्या मुलीसोबत त्यांच्या मुळ गावी राहत होती. त्यांची मुलगी ही शाळेत शिक्षण घेत असताना आरोपी अमोल शिवराज बिराजदार हा नेहमी रस्त्यामध्ये अडवून तिची छेड काढत असे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तक्रारदार महिला या त्यांच्या मुलीसह निगडी येथे रहावयास आल्या. तरीसुद्ध आरोपी अमोल याचे त्यांना व त्यांच्या मुलीस त्रास देणे थांबले नाही. तक्रारदार यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तो त्यांच्या मुलीसह बोलायला देण्याविषयी सांगायचा आणि तक्रारदार यांना अश्लील शिवीगाळ करायचा. त्यातच दि. 25/10/2022 रोजी तक्रारदार यांची मुलगी ही घरासमोर उभी असताना आरोपी अमोल याने अत्यंत अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला आणि तेथून पळ काढला.
यानंतर घाबरलेल्या मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आईने दि. 10/11/2022 रोजी निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली असता घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. ताकतोडे यांनी त्वरित भा.दं. वि. 354, 354 (ड), 504 पोक्सो कायदा कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपली तपासचक्रे फिरवून त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत त्यांना आरोपी कुठे लपला आहे याची माहिती मिळाली आणि 24 तासांत त्यांनी त्या आरोपीस पकडून सुट्टीच्या दिवशी विशेष न्यायालय शिवाजीनगर यांच्या समक्ष उभे केले असता न्यायालयाने आरोपीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आणि पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
या संपूर्ण कारवाईमध्ये मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मा. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मनोज पाटील, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे मॅडम, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ उंडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) निगडी यांचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. ताकतोडे यांना लाभले. तसेच याकामी पो. नाईक संदीप कांबळे आणि हवालदार अवताडे यांचे सहकार्य मिळाले.