ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे-आकुर्डी:-थरमॅक्स चौकातील ड्रेनेजचे तुटलेले झाकण वाहनचालकांना मृत्यूचे निमंत्रण.

प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

थरमॅक्स चौकातील ड्रेनेजचे तुटलेले झाकण
वाहनचालकांना मृत्यूचे निमंत्रण.
आकुर्डी, दि. 13 (शफिक शेख):- थरमॅक्स चौकातील मुख्य ठिकाणी असलेल्या मोठया आकाराच्या ड्रेनेजचे झाकण गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेले असून त्यामध्ये पडून जीव गमाविण्याचा धोका वाहनचालकांना निर्माण झाला आहे. परंतु तरीही वाहनचालक आणि नागरिक येथून जीवन मुठीत धरून ये-जा करीत आहेत.
थरमॅक्स चौकातील आकुर्डीला जाण्याच्या मार्गावर डावीकडे मोठमोठे विद्युत ट्रान्सफॉर्मर्स आहेत. त्याच्या लगतच मोठे खड्डे पडले असून त्या खड्डयांपासून आपला जीव वाचवत वाहनचालकांना आपले वाहने चालवावी लागत होती. त्यातच भर म्हणून गेल्या 30 ते 40 दिवसांपासून चौकोनी ड्रेनेजचे झाकण हे तुटून आतमध्ये पडले आहे. या तुटलेल्या खड्डयात पडून दुखापत किंवा मृत्यूही ओढवू शकतो एवढा मोठा खड्डा पडला आहे. तरीही दुसरा काही पर्याय नसल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना याच तुटलेल्या ड्रेनेजजवळून आपली वाहने न्यावी लागत आहेत. एमआयडीसी आणि मोठी अशी कस्तुरी मार्केट यामुळे येथे वाहनचालकांचा आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. नागरिकांनी आमचे प्रतिनिधी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता आमचे प्रतिनिधींनी ड्रेनेज विभागात याविषयी तक्रार दिली. त्यास काही प्रतिसाद मिळत नसलेला पाहून त्यांनी सारथीवर तक्रार दिली तर संबंधित विभागाकडून आमचे प्रतिनिधींना दूरध्वनीवर कॉल आला आणि त्या ड्रेनेज विभागाच्या महिला अधिका-याने सांगितले की आता झाकणाचे स्टॉक नसून ते बनवून आणावे लागेल. त्यास आज रोजी 8 दिवसांचा कालावधी उलटूनही काहीही कारवाई झाली नाही.
माननीय आयुक्त श्री. शेखर सिंग यांनी या बाबीची गांभिर्याने दखल घेवून एक जीवितहानी टाळण्यासाठी संबंधित ड्रेनेज विभागास त्वरित आदेश देवून सदर जागेतील ड्रेनेजचे झाकण नवीन बसवून त्याच्या शेजारील मोठे खड्डे देखील बुजविण्याचे आदेश स्थापत्य विभागास द्यावेत, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button