पुणे पिंपरी:-पेन्शनधारकांनी बॅंक ऑफ इंडियाच्या घरपोच सेवेचा लाभ घ्यावा – श्री. अनिल कुलकर्णी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पेन्शनधारकांनी बॅंक ऑफ इंडियाच्या घरपोच
सेवेचा लाभ घ्यावा – श्री. अनिल कुलकर्णी.
पिंपरी, दि. 13 (शफिक शेख):- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व पेन्शनधारकांना आपली पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला काढावा लागणार आहे. यासाठी बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने पेन्शनधारकांना या दगदगीपासून वाचविण्यासाठी घरपोच दाखल देण्याची सुविधा सुरू केली आहे. तरी पेन्शनधारकांनी या सुविधेचा लाभ घेवून केवळ नाममात्र शुल्क देवून ही घरपोच दाखला देण्याची सुविधा घ्यावी, असे आवाहन बॅंक ऑफ इंडियाच्या पिंपरी शाखेचे वरिष्ठ प्रशासक श्री. अनिल कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांना केले आहे.
या दाखल वाटपाच्या कालावधीत बॅंकेत भरपूर गर्दी होत असल्याने बॅंकेत दुचाकी पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे. तरी बाहेर दुचाकी पार्क केल्यानंतर सर्व वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. कुलकर्णी यावेळेस केले.
सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी आपली चालू असलेली पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या हयातीचा दाखल सादर करावा लागतो. त्यासाठी बॅंकेत आणि इतर ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होते. वयस्कर पेन्शनधारक हे या गर्दीमुळे आणि प्रवासामुळे त्रासून जातात. कित्येकवेळा त्यांचा अपघातही होतो. यास आळा बसावा म्हणून बॅंक ऑफ इंडियाने पेन्शनधारकांसाठी घरपोच दाखल देण्याची सुविधा सुरू केली आहे जेणेकरून या त्रासापासून पेन्शनधारकांना मुक्ती मिळेल. यासाठी केवळ टोल फ्री नंबर 1800220229/180010031906 या क्रमांकावर संपर्क साधून आपली घरपोच सेवेसाठी नोंद करावी. किंवा आमचे प्रतिनिधी कृष्णा – 8669000294/रमेश 9922603578/विशाल 9022273442 यांच्याशी ही संपर्क साधून आपली नोंद करण्याचे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.