आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-मा. कैलासअण्णा पासलकर यांना महात्मा फुले सामाजिक पुरस्कार तर मा दिपकभाऊ गायकवाड यांना महात्मा फुले युवा गौरव पुरस्कार.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

१७ व्या सुजन पुरस्कारांचे पुणे येथे रविवारी वितरण :

मा. कैलासअण्णा पासलकर यांना महात्मा फुले सामाजिक पुरस्कार तर मा दिपकभाऊ गायकवाड यांना महात्मा फुले युवा गौरव पुरस्कार.

पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दिनांक १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शालजोडी देऊन सत्कार केला या दिनाच्या १७० व्या संस्मरणीय दिनाचे औचित्य.
सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शकोत्तर रौप्य महोत्सव स्मृती वर्ष, राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने सामाजिक ,विधायक, शैक्षणिक, राजकिय तसेच विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे,
” सन्मान युवा मनाचा गौरव फुले विचारांचा” हे ब्रीद घेऊन सलग वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांना सुजन पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे या मध्ये पिंपरी चिंचवड येथे पीएमपील कामगारांची चळवळ उभी करून त्यांच्या न्याय हक्काची लढाई अविरत पणे लढणारे व आपल्या कामगार बांधवांचे विविध प्रश्न आंदोलन तसेच विविध मार्गांनी मार्गी लावणारे मा. कैलासआण्णा पासलकर यांना या वर्षीचा महात्मा फुले सामाजिक पुरस्कार रविवारी सन्मानपूर्वक देण्यात येणार आहेत
याच बरोबर तरुण तडफदार युवा कार्यकर्ते पीएमपील कामगार संघटनेत काम करणारे कामगार प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारे वेगवेगळ्या व्यासपीठावर कामगार बांधवांचे प्रश्न हिरीरीने मांडणारे पीएमपील कामगार बांधवांनाच आपलं कुटुंब मानून त्यांच्या सुख दुःखात एक भाऊ म्हणून उभे राहणारे कामगार नेते मा दिपकभाऊ गायकवाड यांना महात्मा फुले युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

स्थळ व वेळ
रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता

*PMPML राष्ट्रवादी युनियन स्वारगेट मुख्य कार्यालय, इन्कमटॅक्स बिल्डिंग शेजारी, शंकरशेठ रोड, पुणे.

सुजन फौंडेशन
*महात्मा फुले विचार अभियान*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button