वैजापूर:-क्रांती ज्योत कामगार संघटनेच्या वैजापूर तालुका अध्यक्षपदी ज्योती हांगे यांची नियुक्ती.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
क्रांती ज्योत कामगार संघटना. औरंगाबाद.
ज्योती हांगे यांची वैजापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
दिनांक.9/11/2022 या रोजी
औरंगाबाद येथील भानुदास सभागृह इथे तमाम कामगार च्या उपस्थिती मध्ये क्रांती ज्योत कामगार संघटनेच्या 7 व्या वर्धापनदिनी मोठ्या उत्साहात घेण्यात आला. या वर्धापण दिनी शेकडोच्या संख्येने कामगारांची उपस्थिती होती.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपकजी थोरात व मार्गदर्शक श्री विजय दादा साळवे तसेच जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई वाघमारे संगीता गायकवाड. महिला आघाडीच्या सौ खिलारे ताई यांच्या हस्ते क्रांती ज्योत कामगार संघटना औरंगाबाद यांच्या हस्ते ज्योती हांगे वैजापूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. वर्धापन दिनी सर्व कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी एकजुटीने या कार्यक्रमाची नियोजन बद्ध सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडला. सर्व कामगार बंधू भगिनी यांच्यासाठी पाणी चहा व अल्प उपहार ठेवला. वर्धापणदिन सोहळा उत्साह मध्ये पार पडला.अनेक महिला यांनी आपल्या भाषणात आपले मनोगत वेक्त केले. आपले अनुभव व्यक्त केले. अनेक पदाधिकारी यांनी योजनेतील कामगार यांना होणारे लाभ विषयी माहिती दिली
श्री दीपकजी थोरात अध्यक्ष यांनी सर्व कामगारना एक हक्काचये व्यासपीठ मिळून दिले. कामगारच्या न्याय हक्कासाठी हातात क्रांती ज्योत घेऊन एकजुटीने अन्याला लढा देण्याची शपथ घेतली व या वर्धापण दिनास सर्वानी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.