मावळ:-अजित पवार यांच्या हस्ते मावळात आज भात खरेदीला प्रारंभ.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
अजित पवार यांच्या हस्ते मावळात आज भात खरेदीला प्रारंभ.
विकास सोसायटी च्या माध्यमातून मावळात इंद्रायणी भात खरेदीला आज ( दि.११) विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते कामशेत येथे प्रारंभ होणार आहे. मावळ तालुका हा भात पिकाचे कोठार समजले जाते. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाला मावळ तालुक्यासह मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने पुणे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून मावळ तालुक्यात कार्यरत असलेल्या विविध ५५ विकास सोसायटी च्या माध्यमातून हि भात खरेदी केली जाणार आहे. यासाठी सोसायटीच्या माध्यमातून भात खरेदी केंद्र तयार केली असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचे भात खरेदीप्रमाणे त्यांना त्वरित जिल्हा बँकेत पैसे देखील मिळणार असल्याचे हि सांगितले. मावळ तालुक्यात या वर्षी सुमारे १३-१४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. नवनवीन तंत्रांचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेत आहे. याला चांगला हमीभाव मिळावा या हेतूने जिल्हा बँकेच्या माध्यमातून भात विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याने शेतकऱ्याने देखील समाधान व्यक्त केले आहे.