मायणी:-अस्मिता दिवाळी अंक साहित्यिक दृष्ट्या दर्जेदार___डॉक्टर संतोष बजाज.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
अस्मिता दिवाळी अंक साहित्यिक दृष्ट्या दर्जेदार___डॉक्टर संतोष बजाज.
मायणी प्रतिनिधी__महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेत दिवाळी अंकाला एक वेगळी स्थान आहे दिवाळी अंक हा दिवाळीतील बौद्धिक फराळ आहे मानदेशी न्यूज चॅनेलने काढलेला अस्मिता दिवाळी अंक खरोखरच दर्जेदार असून अनेक नवोदित लेखकांना संधी दिली आहे प्रभावी कथा कविता वैचारिक परिसंवाद मुलांक ज्योतिष विश्व इत्यादी प्रकाराने अंक समृद्ध झाला आहे हा अंक वाचकांना निश्चितपणे प्रेरणा देणार आहे या अंकाचे संपादक विजय टाकणे व सहसंपादक दिलीप पुस्तके यांचे मी खास अभिनंदन करतो असे मत आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष बजाज यांनी निमसोड येथे बोलताना व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वदीप आपगे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमरदीप आपगे राजेश पवार प्राध्यापक दिलीप पुस्तके स्नेहल थोरात राजू कचरे उपस्थित होते.