ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-मायणी येथील शिधाधारकांना दिवाळीतील आनंददायी शिधावाटप.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

शिधा धारक गोरख घाडगे यांना शिधा वाटप करताना डॉक्टर दिलीप येळगावकर उपसरपंच जगन्नाथ भिसे व सुरज पाटीलमायणी येथील शिधाधारकांना दिवाळीतील आनंददायी शिधावाटप.मायणी प्रतिनिधी___महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला दिवाळी सुखात जावी यासाठी रेशन दुकानातून साखर तेल गरा इत्यादी इत्यादी पाच वस्तूचे वाटप केवळ शंभर रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु वाहतुकीच्या अडचणीमुळे शिधा वाटपात उशीर झाला आहे. या शिधा वाटपाचा शुभारंभ मायणी येथील दत्तात्रय निकम यांच्या दुकानात नुकताच सुरू झाला खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर व त्यांच्या पत्नी महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या सर्वेसर्वा सौ उर्मिला येळगावकर तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर येळगावकर म्हणाले सरकारने धाडसी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे त्यातूनही गरिबांना दिवाळीसाठी ही मदत आहे वितरण व्यवस्थित त्रुटी निर्माण झाल्याने शिधा वाटपात वेळ झाला असला तरी तुलसी विवाह पर्यंत दिवाळी सुरूच असते असे सांगितले तर शिधाधारकांनी उशिरा का होईना दिवाळी चा शिधा मिळाल्याचा आनंद आहे असे सांगितले या शुभारंभास किसन सुतार उपसरपंच जगन्नाथ भिसे सुरज पाटील दत्ता थोरात नंदकुमार पुस्तके विलास सोमदे गोरख घाडगे तसेच सलीम मुल्ला व असंख्य शिधापत्रिकाधारक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button