निमसोड:-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची वार्षिक कार्यशाळा निमसोड येथे संपन्न.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची वार्षिक कार्यशाळा निमसोड येथे संपन्न.
मायणी प्रतिनिधी___विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा शनिवार दिनांक 29 रोजी निमसोड येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संतोष बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाली प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष संतोष बजाज आणि मानवाचे मौलिक अधिकार याची सविस्तर माहिती दिली त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आली तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोगाच्या भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती ही यावेळी देण्यात आली या वार्षिक कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्राचे आयोगाचे अध्यक्ष अमरदीप. आपगे महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वदीप आपगे उपाध्यक्ष राजेश पवार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ स्नेहल थोरात पश्चिम महाराष्ट्र पत्रकार सेल महासचिव दिलीप पुस्तके जिल्हाध्यक्ष प्रशांत देशमुख कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर संतोष डांगे, जिल्हा सचिव बाबासाहेब कुंभार वाद निवारण अधिकारी कृष्णात पाटील जिल्हा विशेष सल्लागार बाबासाहेब थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेत दीडशेपेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते शेवटी अमरदीप आपगे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.