खटाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा_____डॉक्टर दिलीपराव येळगावकर.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
खटाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा_____डॉक्टर दिलीपराव येळगावकर.
मायणी प्रतिनिधी___कायम दुष्काळाचे ओझे घेऊन जगणाऱ्या खटाव तालुक्यात यंदा मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप हंगामातील काढणीचे पीक वाया तर गेलेच रब्बी हंगामातील पेरणी वाया गेलीअसून संपूर्ण शेतात गुडघाभर पाणी उभा राहिलेले आता पुन्हा पेर करता येत नाही तरी कायम दुष्काळी असणाऱ्या खटाव तालुक्यात यंदा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील पीक कुजून गेली नद्या नाले पुढे भरून वाहू लागले त्यामुळे ओड्यावर असलेले सा कव बंधारे वाहून गेले त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली या परिस्थितीची पपाहणी करून त्यांनी आपला अहवाल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठवला असून त्यांनी या अहवालाची गंभीर दखल घेतली असून तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.