पुणे भोसरी:-रस्त्यावर जनावरे मोकाट सोडल्याने अज्ञात मालकाविरूद्ध गुन्हा दाखल.
प्रतिनिधी शाफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
रस्त्यावर जनावरे मोकाट सोडल्याने अज्ञात मालकाविरूद्ध गुन्हा दाखल.
भोसरी, दि. 22 (शफिक शेख):- पुणे-नाशिक रोडवर, चांदणीचौक, राजमाता जिजाउ उड्डाणपूल भोसरी येथे सार्वजनिक ठिकाणी खासगी मालकीची जनावरे मोकाट सोडून सर्वसामान्यांना उपद्रव होण्याचे कारण ठरल्याने, रोगराई पसरण्याचे कारणाने, तसेच रस्त्यावरून जाणा-या वाहनांना व सार्वजनिक रहदारीस अडथळा होवून अपघात होण्याच्या शक्यता निर्माण केल्याने भोसरी पोलिसांनी संबंधित जनावरांच्या अज्ञात मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, कोणीतरी अज्ञाताने पुणे-नाशिक रोडवर, चांदणीचौक, राजमाता जिजाउ उड्डाणपूल भोसरी येथे सार्वजनिक ठिकाणी खासगी मालकीची जनावरे मोकाट सोडली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास, वाहनांच्या अपघातास आणि रहदारीस अडथळा निर्माण होईल म्हणून पोलिसांनी सदरची जनावरे ताब्यात घेवून त्यांच्या अज्ञात मालकाविरूद्ध भारतीय दंड विधान कलम 269 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 106/117 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर अज्ञात मालक हा सापडलेला नसून त्याचा शोध भोसरी पोलीस ठाणेमार्फत सुरू असून लवकरच त्यांचा पकडून सदर गुन्हयात अटक केली जाईल.
सदरचे आदेश हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिले असून त्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, अरविंद पवार, सुहास खाडे, पोलीस हवलदार भोसले तथा पोलिस हवालदार चपटे हे करीत आहेत.