श्रीरामपूर:-उदिरगावच्या निवडणुकीत उमेदवार केला मृत घोषित.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
उदिरगावच्या निवडणुकीत उमेदवार केला मृत घोषित.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील उंदिर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत अंकुश फकिरा बर्डे यांचा सरंपचपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला . परंतु बर्डे जिवंत असताना मतदान यादीत मात्र मृत घोषित करून यादी मध्ये क्र 493 डिलीट ( नष्ट ) असे लिहिण्यात आल्याचा अजब प्रताप करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. यामध्ये कामगार तलाठी यांच्या निष्काळजीपणा मुळे जिवंत उमेदवाराचा मृत घोषित करण्याचा प्रकार घडला . दरम्यान ही बाब निदर्शनास आल्या वर तहसीलदारांनी कामगार तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. निवडणुक मतदार यादी फार महत्वाची असते . चुकांवरून प्रशासनाचा अनागोंदी कारभार लक्षात येतो . नजरचुकीने झाले कि कोणाच्या सांगण्यावरून नाव कमी केले . असा आहे या गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी . अशी मागणी अग्निपंख सर्वसामान्य जनता आघाडीचे स्वप्नील पंडित यांनी केली आहे. दरम्यान हा गैरप्रकार आ . लहु कानडे यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधला त्वरित कारवाई करण्यास सांगितल्याने अंकुश बर्डे यांचा उमेदवारी अर्ज ग्राहा धरण्यात आला आहे.