आष्टी:-हजरत रोडगिरी बाबा यात्रा उत्सवासाठी जय्यत तयारी; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा रंगणार!
पत्रकार अमजद शेख बीड जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आष्टी:-हजरत रोडगिरी बाबा यात्रा उत्सवासाठी जय्यत तयारी; हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा रंगणार!

आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील हिवरा, डोंगरगण, दादेगाव, भोजेवाडी आणि सुलेमान देवळा या गावांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत असलेल्या हजरत रोडगिरी बाबा यांच्या वार्षिक यात्रा उत्सवाचे आयोजन गुरुवार, दि. ३० जुलै रोजी करण्यात आले असून, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. यात्रेनिमित्त दर्शन, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना, दुआ तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हजरत रोडगिरी बाबांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, अहमदनगर तसेच आष्टी तालुका आणि परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, यात्रेचा आनंद लुटण्यासाठी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यात्रा उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी आयोजक समितीने आवश्यक नियोजन केले असून, भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.




