ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मावळ:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पवन मावळ विभाग यांचा मेळावा संपन्न.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पवन मावळ विभाग यांचा मेळावा संपन्न.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पवन मावळ विभाग यांच्या वतीने दि.7/10/2022 रोजी सकाळी 11वा शांताई मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे यांचा विभागाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ त्याच प्रमाणे विभागातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम तालुक्याचे अध्यक्ष मा. लक्ष्मण भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमास पवन मावळ विभागातील आणी जिल्ह्याचे त्याचप्रमाणे तालुक्यातील इतर विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूर्यकांतजी वाघमारे यांनी आपल्या भाषणामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच सामाजिक कार्यामध्ये कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा सर्वसमान्यांचे प्रश्न सोडवावेत अशा सूचना देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव तसेच जिल्हा युवक अध्यक्ष डॉ.समीर आण्णा जाधव जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या पवन मावळ युवक अध्यक्ष अरविंद रोकडे यांनी आलेल्या मान्यवरांचे तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पवन मावळ विभागाच्या वतीने आभार मानले.
उपस्थितांमध्ये जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मालनताई बनसोडे, जिल्हा सरचिटणीस गणेशजी गायकवाड, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस अतुल सोनवणे,मावळ ता. महिला आघाडी प्रभारी अध्यक्षा भावनाताई ओव्हाळ,मावळ तालुका संघटक सचिव प्रफुल्ल भालेसेन , पवन मावळ अध्यक्ष दादासाहेब वाघमारे, सिद्धार्थ भालेराव नानेमावळ युवक अध्यक्ष , बाळासाहेब जाधव नाणेमावळ अध्यक्ष, विकास शिंदे अंदर मावळ युवक अध्यक्ष विजय जाधव,निलेश यादव, शरद सोनवणे,संदीप सोनवणे, गणेश गायकवाड प्रदीप वाघमारे, मारुती सोनवणे, माऊली सोनवणे, सनी भालेराव, सुशांत कदम, प्रशांत गायकवाड, उत्तम गायकवाड, तसेच विभागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button