क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकण:-अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा निर्दपणे खून.

प्रतिनिधी शाफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा निर्दपणे खून.
चाकण, दि. 8 (शफिक शेख):- आपल्या पत्नीचे दुसरे कोणाबरोबर अनैतिक संबंध आहेत या कारणावरून गोरक्ष बबन देशमुख या इसमाने आपल्या पत्नीचा इतर 4 साथींच्या मदतीने खून केला. याबाबत विक्रम सिताराम गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेदनकरवाडी, बोरजाई माता मंदिराजवळ देशमुख दाम्पत्य राहत आहेत. त्यापैकी पती गोरक्ष बबन देशमुख यास आपल्या पत्नीचे दुसरे कोणाबरोबर अनैतिक संबंध आहेत असा संशय होता. या कारणावरून त्यांची अनेकवेळा भांडणे होत असत. अखेर या भांडणाचे पर्यावसन गोरक्ष यांच्या पत्नीच्या खूनामध्ये झाले.
गोरक्ष देशमुख याने आपला मित्र रोशन गजानन भगत, रोशनचा मित्र देवा, बबन शिवलिंग देशमुख आणि आणखी एकासोबत मिळून आपल्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. आणि त्याप्रमाणे या पाचही जणांनी मिळून दिनंाक 29/8/2022 रोजी प्रथम गोरक्ष देशमुख याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत आळंदी घाटात फॉरेस्टच्या जागेत पुरले. त्यानंतर दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोरक्ष देशमुख आणि बबन देशमुख या दोघांनी प्रेत पुरल्याच्या ठिकाणी जावून प्रेत उकरून काढले आणि ते जाळले परंतु पाउस येत असल्याने प्रेत पूर्ण जळाले नाही त्यामुळे त्यांनी ते अर्धवट जळालेले प्रेत फॉरेस्ट जवळ असलेल्या तळयामध्ये फेकून दिले. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक राठोड हे करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button