ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर-सिरसगाव:- ग्रामपंचायतच्या स्थावर मालमत्तेवर नागरिकाचे बेकायदेशिर आतिक्रमण
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वैजापूर शिरसगाव ग्रामपंचायत गावातील जय जनार्दन किराणा स्टोअर चे मालक रामेश्वर अंबादास झिने यांनी ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या शासकीय हौदावरती अनधिकृत बांधकाम करत असून ताबा मिळवत आहेत. सदरील हौद माननीय आमदार स्वर्गीय कैलास पाटील (आबा) चिकटगावकर यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेला होता. रामेश्वर झिने हे त्या ठिकाणी पक्के बांधकाम करत असून अतिक्रमण करत आहेत. हे अतिक्रमण तात्काळ थांबवण्यात यावे आणि अतिक्रमण करत असलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिरसगाव गावातील नागरिकांनी केलेली आहे.