मुंबई:-राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवास व दैनिक भत्त्यात वाढ.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या
प्रवास व दैनिक भत्त्यात वाढ.
मुंबई, दि. 7 (शफिक शेख):- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय कामकाजास्तव प्रवास व दैनिक भत्त्यात भरमसाठ वाढ करून त्यांना खूष केले आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे शासकिय अधिकारी आणि कर्मचारी वर्गातून राज्यपालांचे अभिनंदन केले जात आहे.
शासकीय दौ-यातील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैद्राबाद शहरातील अनुसूचित दर आकारणा-या हॉटेलमधील वास्तव्याकरिता विहीत केलेल्या दैनंदिन भत्त्यामधून खर्च भागविणे शक्य नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यपालांनी सदर भत्तेवाढीस मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले आहे.