आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-महांकाळवाडगाव जिल्हा परिषद शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश!

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) माळेवाडी:-महांकाळवाडगाव जिल्हा परिषद शाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश!

राज्यस्तरीय लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षा २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; चार विद्यार्थ्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव
माळेवाडी | RPS STAR NEWS प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
श्रीरामपूर तालुका केंद्रस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ रविवारी उत्सव मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी महांकाळवाडगाव जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
या परीक्षेत रोहित विजय पांढरे (इयत्ता पाचवी), निलेश सोपान पवार (इयत्ता पाचवी), समृद्धी गणेश दहिटे (इयत्ता दुसरी) आणि देविका संदिप सांगळे (इयत्ता दुसरी) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महांकाळवाडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, तसेच श्रीमती पंडित, जवणे व श्रीमती सोनवने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच पालकांनीही विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिल्याने हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे यशाबद्दल पालक, ग्रामस्थ आणि शाळा परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच राहुल चोरमल, संदीप सांगळे, सोपान पवार, भगवान पांढरे, राम दातीर, संजय मापारी, अजित पवार, लक्ष्मण सांगळे, विलास दहिटे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

2) श्रीरामपूर:-अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ द्या; अन्यथा २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण!

श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेचा तहसीलदारांना इशारा; २०२५ खरीप व २०२६ रब्बी हंगामातील नुकसानभरपाईची मागणी.

श्रीरामपूर / माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) :
मागील दीड वर्षापासून आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. २०२५ खरीप आणि २०२६ रब्बी हंगामातील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याने २ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यासंदर्भात अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे व तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान
सप्टेंबर तसेच मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, मका आणि घास बियाणे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे गहू, कांदा, हरभरा यांसह विविध रब्बी पिकांना मोठा फटका बसला.
या नुकसानीची महसूल विभाग तसेच कृषी विभागाकडून रीतसर पंचनामे करण्यात आले होते. मात्र पंचनामे होऊनही अद्याप नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मिळणारी नुकसानभरपाई श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
“शेतकऱ्यांमध्ये भेदभाव नको”
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुकसानभरपाईची मदत मिळाल्याचे सांगत, श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नियमानुसार तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
“नुकसान सर्वांचे झाले असताना मदत देताना भेदभाव का?” असा सवाल उपस्थित करत शासनाने आणि पालकमंत्र्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोन्ही हंगामातील प्रलंबित मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
मदत न मिळाल्यास २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन नुकसानभरपाई अदा करण्याची कार्यवाही न केल्यास २ ऑक्टोबरपासून श्रीरामपूर तहसील कार्यालयात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील पीक विम्याच्या प्रश्नावरही शेतकरी संघटनेने गंभीर आरोप केले आहेत. कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी पीक कापणी प्रयोगादरम्यान कथितरीत्या चुकीची आकडेवारी सादर करून कापूस पिकाचे उत्पादन प्रत्यक्षापेक्षा अधिक दाखविल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केला.
रँडम पद्धतीने निवडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पीक कापणी प्रयोग करण्यात आले. मात्र संबंधित शेतकऱ्यांशी विचारणा केली असता, “आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा संघटनेने केला आहे.
यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो की पीक विमा कंपन्यांच्या हितासाठी? असा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे अनिलराव औताडे यांनी म्हटले आहे.
पीक कापणी प्रयोगावेळी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे
पीक कापणी प्रयोगाच्या वेळी शेतकऱ्यांनी अधिक जागरूक राहावे. आपल्या शेतातील प्रत्यक्ष उत्पादनाची वस्तुस्थिती तपासूनच पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर स्वाक्षरी करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र काही ठिकाणी कथित संगनमताने उत्पादन जास्त दाखविल्यामुळे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णायक लढ्याचा इशारा
शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पीक विमा आणि नुकसानभरपाईचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करत संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले आहे. शासनाने याची दखल घेऊन प्रलंबित मदत तात्काळ वितरित करावी; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
“पंचनामे झाले, नुकसान सिद्ध झाले; आता मदत देण्यास विलंब का?” असा सवाल करत शेतकरी संघटनेने प्रशासनाला निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
शिष्टमंडळात यांचा सहभाग
यावेळी डॉ. दादासाहेब आदिक, डॉ. विकास नवले, कडू पवार, इंद्रभान चोरमल, सदाशिव उंडे, माजी नगरसेवक शशांक रासकर, सागर गिऱ्हे, सतीश नाईक, साहेबराव चोरमल, बबन उघडे, गोकुळ भालदंड, युनूस शेख, अकबर शेख, दत्तात्रेय साधाफळ, रामदास तरकसे, शिवाजी भालदंड, भाऊसाहेब पडोळे, बाबासाहेब वेताळ, बापू गोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button