आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे चिंचवड:-केवळ 10 रूपयांत सर्व उपचार असलेला धर्मादाय दवाखाना विद्यानगर येथे सुरू.

प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

केवळ 10 रूपयांत सर्व उपचार असलेला
धर्मादाय दवाखाना विद्यानगर येथे सुरू.

चिंचवड, दि. 1 (शफिक शेख):- गरीब व गरजू रूग्णांकरिता कै. लाला किशनलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ श्री. देविचंद किशनलाल अग्रवाल यांच्यातर्फे श्री अग्रसेन दवाखाना या नावाने जय भवानी वजनकाटयाजवळ, विद्यानगर चौक, चिंचवड, पुणे – 411019 येथे केवळ 10 रूपयांमध्ये सर्व ओपीडी उपचारांनी सुसज्ज असलेला दवाखाना सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त आणि माजी नगरसेवक श्री. प्रकाश बाबर यांनी दिली.
या दवाखान्यामध्ये सर्व गरीब व गरजू व्यक्तींना डॉ. संतोष अग्रवाल (एमबीबीएस) डॉक्टरांद्वारे ओपीडी उपचार दिले जाणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारची एक्सरे, सोनेग्राफी करण्याची गरज असल्यास सवलतींमध्ये ते सर्व टेस्ट करण्याचे मार्गदर्शनही दिले जाणार आहे. तसेच विविध आरोग्य शिबीरांचे या दवाखान्यात आयोजन केले जाणार असल्याचे श्री. बाबर यांनी आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांच्याशी बोलताना सांगितले.
शासकीय रूग्णालयांमध्ये ओपीडी उपचार आणि औषधे यासाठी 50 रूपये आकारले जात असताना माणुसकीचा वारसा जपत अग्रसेन दवाखान्यात केवळ 10 रूपयांमध्ये उपचार करण्यात येणार असल्याने गरीब व गरजू रूग्णांना याद्वारे एक दिलासा मिळणार आहे. तरी गरजूंनी दरराज सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत या उपचारांचा लाभ घ्यावा.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button