पुणे:-हडपसर पोलिसांची चमकदार कामगिरी; 48 तासांत विविध गुन्हयांचे 8 आरोपी अटकेत.
प्रतिनिधी शफिक निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
हडपसर पोलिसांची चमकदार कामगिरी; 48 तासांत
विविध गुन्हयांचे 8 आरोपी अटकेत.
हडपसर, दि. 01 (शफिक शेख):- हडपसर पोलिसांनी चमकदार कामगिरी करीत 48 तासांमध्ये एक खून, एक दरोडा आणि 2 जबरी चो-यांमधील एकुण 8 आरोपींना अटक केली आहे.
1. 25 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मंतरवाडी रोडवरून जात असताना नंबरप्लेट नसलेल्या काळया अॅक्टिव्हावरून आलेल्या इसमांनी फिर्यादी ड्रायव्हरला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा मिळून 15000 रूपये किमतीचा माल लुटला. आणि पळून गेले त्याचवेळेत फुरसुंगी मार्शल प्रशांत भोसले आणि हेमंत कुंभार यांनी सदर काळी अॅक्टिव्हा ट्रिपल सीट वरून जाताना दिसली त्यांनी शंका आल्याने त्यांनी हटकले असता आरोपींनी अॅक्टिव्हा सोडून पळ काढला. तपास पथकातील अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधारकर यांनी तपास करताना आरोपी ओमकर उर्फ खंडया राजू शिंदे आणि इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा, चोरलेला मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 120000 रूपयांचा मुद्देमाल सापडला. त्याप्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे करीत आहेत. सदर आरोपींकडून आणखी जबरी गुन्हे उघड होण्याची शक्यता तपास अधिकरी शिंदे यांनी व्यक्त केली.
2. नारळ बाग, केशव चौकाजवळ माळवाडी हडपसर येथील रिक्षाचालक आरोपी कृष्णा विठ्ठल रेखले याने भंगार विक्रीच्या पैसे वाटपातील वादावरून रिक्षाचालक सागर गायकवाड यांस बांबुने आणि दगडाने मारहाण करून ठार मारले. आणि त्याचा मृतदेह तेथेच टाकून दिला. तपास पथकातील अधिकारी विजयकुमार शिंदे, अविनाश शिंदे, समिर पांडुळे, प्रशांत दुधाळ, शाहीद शेख, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे यांनी सदर प्रकरणाचा तपास करून 2 तासांच्या आता आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.
3. फरारी गुन्हेगार ऋषिकेश पांचाळ, त्याचा साथीदार आकाश दीपक साटम आणि एक जण असे तीन जणांनी मिळून फिर्यादी हे निर्मल टाउनशिप येथून पायी जात असताना शाईन बाईकवरून आले आणि फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेला. त्यावर कारवाई करताना सदर दोन्ही सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपास पथकातील पोलीस अंमलदार निखिल पवार आणि प्रशांत दुधाळ यांनी शोधून काढले आणि अटक केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.
4. कॉलेजमध्ये शिक्षण घेणा-या आरोपी शुभम मोरे, प्रसाद हनुमंत कांबळे आणि हेमंत संदीप चौगुले यांनी मौजमजेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने हॉटेल पिंगारा, मोर मॉलशेजारी, काळेपडळ हडपसर येथे फिर्यादी हे काम करित असताना त्यांच्या गळयाला कोयता लावून तसेच डाव्या खांद्यावर कोयत्याने वार करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून हॉटेलच्या गल्ल्यातील रोख 24000 रूपये चोरून नेले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत एकुण 7 आरोपींपैकी 3 आरोपी यांना अटक करून त्यांची 3/10/2022 पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.
सदर गुन्हयांचे उघडकीस आणणेसाठी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त परी. 5 श्रीमती नम्रता पाटील आणि सहा. पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, विश्वास डगळे हे अधिकारी आणि तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे आणि तपास अंमलदार शाहीद शेख यांनी कामगिरी केली.