हवेली – दिघी :-मैत्रीला खिंडार पाडून एका मित्राने केला दुस-याचा खून; दोन आरोपी अटकेत.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मैत्रीला खिंडार पाडून एका मित्राने केला दुस-याचा खून; दोन आरोपी अटकेत.
दिघी, दि. 26 (शफिक शेख) – वर्षांच्या जुन्या मैत्रीला खिंडार पाडून एका मित्रानेच आपल्या मित्राचा खून केल्याची घटना गुलमोहर सोसायटी, च-होली येथे घडल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जहीर सुनशरीफ शेख उर्फ सलीम व गणेश लक्ष्मण गायकवाड या दोघांमध्ये खूप जुनी मैत्री होती. परंतु यांच्या मैत्रीला कुणाची नजर लागली आणि सलीम शेख याने त्याच्या एका साथीदार गिरीष गुलाब गायकवाड याच्यासोबत संगनमत करून गणेश यांस दारू पिण्याच्या बहाण्याने च-होली बुद्रुक ता. हवेली. जि. पुणे या ठिकाणी नेवून त्याच्या डोक्यामध्ये कोणत्यातरी वस्तूने मारून त्याला गंभीर जखमी केले त्यातच त्याचा मृत्यू झाला. गणेशचे मृत्यू झाल्याचे पक्के झाल्यानंतर गुलमोहर सोसायटीच्या समोरील ओढयामध्ये त्याचा मृतदेह टाकून देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी मयत गणेश लक्ष्मण गायकवाड याचा चुलत भाउ याने दिघी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी भा. द. वि. कलम 302, 201 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उप निरीक्षक एस. एम. भदाणे यांनी त्वरित कारवाई करून दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली आहे. खूनाच्या कारणाबाबत श्री. भदाणे यांना विचारले असता चौकशी सुरू असून अद्यापही खूनाचे कारण समजू नसल्याचे श्री. भदाणे यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.