क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपरी:-मुले पळविणा-या टोळीबाबत पोलीस आयुक्तालयाचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुले पळविणा-या टोळीबाबत पोलीस आयुक्तालयाचे
नागरिकांना सावधानतेचे आवाहन.

पिंपरी, दि. 26 (शफिक शेख) – अलीकडेच पिंपरी-चिंचवड शहर आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून लहान मुलांना पळविणा-या टोळीच्या सक्रियतेबाबत विविध प्रकारच्या व्हिडिओ/ऑडिओ क्लिप्स, फोटोस व्हायरल होत असून त्यामुळे जनमानसांत आणि विशेषतः पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अशी कोणतीही टोळी पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये सक्रिय नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच असा कुठलाही अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून घटनेची शहानिशा करून घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे अशा प्रकारची कोणतेही व्हिडीओ/ऑडियो किंवा फोटो आपल्यास निदर्शनास आल्यास नागरिकांनी पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय ते फोटो पुढे सोशल मिडियावर प्रसारित करू नये. अशा प्रकारच्या खोटया अफवांद्वारे समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणा-यांवर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे. तरी नागरिकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button