क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

पिंपरी- चिंचवड:-वर्ल्ड किकबॉक्सिंगसाठी अमीन व कियांश यांची निवड.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

वर्ल्ड किकबॉक्सिंगसाठी अमीन व कियांश यांची निवड.

पिंपरी, दि. 25 (शफिक शेख) – पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उंचावत अमीन शेख व कियांश डाकलीया या दोन विद्यार्थ्यांनी इटली येथे होणा-या वर्ल्ड किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
1 ते 9 ऑक्टोबरदरम्यान होणा-या इटली येथील वाको चिल्ड्रन कॅडेट आणि ज्युनिअर किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 या अंातरराष्ट्रीय स्पर्धेत अमिन शेख 36 किलो वजनगटात तर कियांश डाकलिया 32 किलो वजनगटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जगभरातून सामील होणा-या या स्पर्धेमध्ये हे दोन्ही खेळाडू सर्वात लहान खेळाडू आहेत, अशी माहिती भारतीय संघाचे कोच व भारतीय किक बॉक्सिंग स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश शेलार यांनी दिली.
यापैकी अमीन शेख याने जुलै 2022 मध्ये कोलकाता येथे झालेल्या नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. एव्हढया लहान वयात मिळविलेल्या या अगाध यशाबद्दल संपूर्ण पिंपरी-चिंचवड वासियांकडून या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button