पनवेल:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल जिल्हा आयोजित आढावा बैठक.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल जिल्हा आयोजित आढावा बैठक.जिल्हा अध्यक्ष सतिशजी पाटील याच्या नेत्रत्वाखाली संपन्न.
आज शनिवार दिनांक 24/9/2022 रोजी दुपारी 12 वाजता कळबोली नवी मुंबई येथील कॉलेजच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल जिल्हा आयोजित आढावा बैठकीचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सतिशजी पाटील यांनी प्रस्ताविक करून बैठकीस सुरवात केली. कार्यकर्त्यांना संबोधीत करताना पनवेल जिल्ह्याच्या अनेक समस्या बाबत आढावा घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पनवेल महानगरपालिका होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2022/23 करिता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागा. प्रसंगी आपल्याला सर्वच्या सर्व जागा लढाव्या लागल्या तरी आपण लढण्याची तयारी ठेवावी. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. देशाचे जाणते राजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचद्रजी साहेबांचे विचार तळागाळात पोहचवा
व कार्यकर्त्यानी एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, सदस्य नोंदणी अभियान राबविणे इ. बाबत मार्गदर्शन केले त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांतजी पाटील साहेब , महराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला सौ. भावनताई घाणेकर ,यांनी उपस्थित बैठकीस मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी, ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष राजुभाई मुलाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी सभा संपल्याचे जाहीर करून उपस्थितांचे आभार मानले.
सदर सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील साहेब , प्रदेश सरचिटणीस भावनताई घाणेकर, जिल्हा अध्यक्ष सतीशजी पाटील साहेब,राष्ट्रीय उपाध्यक्ष अल्प स सेल फारूक भाई पटेल युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल, विधानसभा अध्यक्ष विजयकुमार चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी, सरचिटणीस रामदास नारकर, ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष राजू भाई मुलाणी, खारघर शहर महिला अध्यक्षा राजेश्री ताई कदम ,मुनावर देशमुख, नागेश पवार ,श्री साळुंखे , शहबाज पटेल प्रज्ञा चव्हाण, इ. महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्याच बरोबर जिल्ह्याचे सर्व सेल अध्यक्ष सर्व युवक पद्धधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.