ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपरी :-पोलीस दलातील ‘‘फिट’’ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस आयुक्तांकडून बक्षिस वितरण.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे :-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

पोलीस दलातील ‘‘फिट’’ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस आयुक्तांकडून बक्षिस वितरण.

पिंपरी, दि. 25 (शफिक शेख) – शहरातील वाढत्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना स्वतःही आरोग्याच्यादृष्टीने फिट राहण्याची गरज असल्याने गोकी स्मार्ट बॅंड या कंपनीच्या वतीने गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. अंकुश शिंदे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय निगडी येथे बक्षिस वितरण करण्यात आले.
ही स्पर्धा दिनांक 26 फेब्रुवारी 2022 ते 27 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. 1000 कि.मी. सायकल चालवणे आणि 300 मीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत भाग घेतलेल्या 2194 पोलीस अधिकारी व अंमलदारांपैकी 44 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1000 किमी सायकल चालवणे तर 50 जणांनी 300 मीटर धावणे या स्पर्धेत विजयी झाले आहेत. विजयी स्पर्धकांना आयुक्तांच्या हस्ते स्मार्ट गिअर सायकल बक्षिस स्वरूपात देण्यात आली.
यावेळी मा. शिंदे यांनी माजी पोलीस आयुक्त श्री. कृष्णप्रकाश यांच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच गोकी स्मार्ट बॅंडच्या टीमचेही कौतुक केले. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हे फ्रंट वॉरिअर्स आहेत अहोरात्र समाजाच्या सुरक्षितता आणि लोकांच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत असताना व्यामाच्या सहायाने शारीरिक व मानसिकरित्या मजबूत राहणे गरजेचे असल्याचे श्री. अंकुश शिंदे यांनी सांगितले.
यावेळी विजेते स्पर्धक श्री. सागर कवडे, श्री. राकेश गुमाने, श्रीमती स्वाती लामखेडे, श्रीमती सुरेखा देशमुख व श्री विनायम विधाते यांनी पोलीस आयुक्तालयाचे आभार मानले. यावेळी आयुक्तांसह श्री. रावसाहेब जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी आणि गोकी फिटनेस स्पर्धेचे 94 विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button